काश्मिरला गेलेल्या ५२० पर्यंटकांशी संपर्क   

सर्वजण सुरक्षित, जिल्हा प्रशासनाची माहिती

पुणे : काश्मिरमध्ये अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील  पर्यटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधला आहे. सुमारे ५२० पर्यंटक हे काश्मिर येथे गेले आहेत. या पर्यटकांचे नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला फोन करून पर्यटक कुठे आहेत, याची माहिती दिली. जिल्हा आपत्ती विभागाच्या वतीने पर्यटकांना तुम्ही कुठे आहात, किती जण आहात यांची सर्व माहिती घेतली जात आहे. तसेच तुम्ही काळजी करुन नका, तुम्ही सुरक्षित असल्याचे सांगत धिर देण्याचे काम केले जात आहे.
 
पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटक भयभीत झाले आहेत. तिथे अडकेलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला असून तो २४ तास सुरू आहे. साधारण रात्री साडे आठ नंतर नियंत्रण कक्षाला फोन सुरू झाले आणि सर्वांनी चिंता वाटत असून पुण्याला परत येण्याची एकच मागणी केली जात आहे.
 
जिल्हातील पर्यटकांची माहिती संकलीत करुन राज्य आणि केंद्र सरकारला पाठविण्यात येत आहे. याची यादी करुन राज्य सरकार या पर्यटकांना कशा प्रकारे पुण्यात आणला येईल याची चाचपणी करत आहेत. पुणे, पिंपरी- चिंचवड आणि ग्रामिण भागातील पर्यटक आहेत.महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा या धक्कादायक हल्ल्यामध्ये मृत्यू झाला असून संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी जखमी आहेत. तसेच अन्य एक पर्यटक जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. 
 
सुदैवाने सध्या या तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच पुणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष जगदाळे आणि गनबोटे कुटंबांच्या संपर्कात आहे. महाराष्ट्रातील आणि पुण्यातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. कौस्तुभ गनबोटे यांच्या मुलीशी तसेच संतोष जगदाळे यांच्या पत्नीशी देखील संपर्क झाला असून त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय व अन्य मदत, उपचार दिले जात आहेत.
 

Related Articles